छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीचा ६ वा बळी : एकाच गावातील आणखी एका शेतकऱ्याची ४ दिवसांच्या फरकाने आत्‍महत्‍या, शर्टाने झाडाला घेतला गळफास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा मिळण्यात होत असलेली दिरंगाई त्‍यांच्या संयमाचा बांध तोडताना दिसत आहे. सोयगावपासून शेतकरी आत्‍महत्‍येचे सुरू झालेले सत्र गंगापूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरूच आहे. अतिवृष्टीचा आता ६ वा बळी गेला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील बकापूर पळशी येथील आणखी एका शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केली आहे. वरझडी शिवारातील माळरानावर शेतकऱ्याने शर्टाच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला. ही खळबळजनक शनिवारी (४ ऑक्‍टोबर) दुपारी समोर आली.

आप्पासाहेब कोंडीराम पळसकर (वय ५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यापूर्वी . बकापूर पळशी येथीलच मधुकर सर्जेराव पळसकर (वय ५४) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे ३० सप्‍टेंबरला समोर आले होते. आता आप्पासाहेबांच्या आत्‍महत्‍येनंतर गाव हादरून गेले आहे. करमाड पोलिसांना कळताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. अतिवृष्टीमुळे शेतातील पूर्ण पीक नष्ट झाल्याने आप्पासाहेबांनी आत्‍महत्‍या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. आप्पासाहेबांवर खासगी व बँकेचे कर्ज होते. पीक वाया गेल्याने ते कसे फेडायचे, याची त्यांना चिंता लागली होती. यातूनच नैराश्यात जात त्‍यांनी आत्महत्या केली. त्‍यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राहुल पगारे करत आहेत.

जिल्ह्यात आंदोलने, पण मदतीची कवडीचीही नाही...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १०० टक्‍के पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तातडीने सरसकट मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. सत्ताधारी आमदारांनी तोंडदेखली पाहणी केली. पण प्रत्‍यक्षात मदतीची कवडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पंचनामे करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सिल्लोडमध्ये सरपंच मंगेश साबळे यांचे आंदोलनही दुर्लक्षित केले जात आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software