२० रुपयांवरून भांडण, हॉटेल मालकाची अरेरावी, नंतर ग्राहकाचे डोके काठीने फोडले, पाचोडमध्ये काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पाचोडजवळील दाभरूळ शिवारात हॉटेल यशवंतमध्ये अवघ्या २० रुपयांवरून ग्राहक आणि हॉटेल मालकात राडा झाला. हॉटेलमालकाने ग्राहकाला अरेरावी केली,नंतर बेदम मारहाण केली. लाकडी काठीने डोके फोडले. या घटनेची ग्राहकाने शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हॉटेल मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विलास आसाराम नेमाणे (वय ४३, रा. कल्याणनगर, पाचोड, ता पैठण) असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. ते २ नोव्हेंबरला संध्याकाळी सव्वा सहाला वकिलासोबत चर्चा करत हॉटेल यशवंतमध्ये बसले होते. त्यांनी वेटरला सहा कोल्ड्रींक व एक पाण्याच्या बॉटलची ऑर्डर दिली. कोल्ड्रींक पित ते वकिलासोबत बोलत असताना थोड्यावेळाने त्यांनी वेटरला आवाज देऊन मसाला पापडची ऑर्डर दिली. पण वेटरने मसाला पापड लवकर आणला नाही. त्यामुळे नेमाणे यांनी हॉटेलमालकाला विचारले की, ऑर्डर अजून आली नाही.

तुम्ही तुमच्या वेटरला विचारा, माझी ऑर्डर काय दिली आहे, असे बोलता बोलता त्यांचा हॉटेलमालकासोबत बोलाचाल झाली. त्यावर नेमाणे यांनी माझे बिल किती झाले मला सांगा, असे हॉटेलमालकाला सांगितले. हॉटेलमालक बोलला की, बिल १६० रुपये झाले आहे. त्यावर नेमाणे यांनी त्याला बील १४० रुपये झाल्याचे सांगितले. त्यावर हॉटेलमालकाने १४० रुपये दे आणि येथून निघून जा, असे म्हणत अरेरावी केली. त्यावर नेमाणे यांनी त्याला आरे तुरे बोलू नको, असे म्हटले.

त्यावर काऊंटरजवळ उभ्या हॉटेल मॅनेजर आणि मालकाने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या भांडणात नेमाणे यांची उजव्या हातातील बोटातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी कोठेतरी पडली व मोबाइलला फटका बसून खराब झाला. नेमाणे हे घाबरून कागदपत्रांची फाईल ज्यात ६ हजार रुपये होते, ती तिथेच सोडून पळाले. मात्र हॉटेल मालकाने मागून धावत येत लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नेमाणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार रवींद्र अंबेकर करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software