छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ पुरुषांसह एका महिलेची आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरात दोन आणि कन्नड, शिऊरमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण ४ आत्‍महत्‍येच्या घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत. भाऊसाहेब अण्णा खरात (वय ४१, रा. ब्रिजवाडी, छत्रपती संभाजीनगर), शीतल विलास जाधव (वय ३९, रा. एन १३ वानखेडेनगर, छत्रपती संभाजीनगर), सुभाष त्रिंबक सूर्यवंशी (वय ५२, रा. शिऊर, ता. वैजापूर), छब्बू फकिरराव थोरात (वय ६२, रा. दत्त कॉलनी, कन्नड) अशी आत्‍महत्‍या केलेल्यांची नावे आहेत.

घटना पहिली : ब्रिजवाडीतील भाऊसाहेब खरात यांची पत्नी वर्षभरापूर्वी माहेरी निघून गेली होती. घरात वृद्ध आई आणि एक भाऊ आहे. भाऊसाहेब मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी (८ डिसेंबर) त्यांनी नैराश्यातून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना चिकलठाण्यातील मिनी घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी भाऊसाहेब यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद  करून तपास सुरू केला आहे.
घटना दुसरी : वानखेडेनगरात राहणाऱ्या शीतल जाधव या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (८ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ही बाब समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बेगमपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

घटना तिसरी : अतिवृष्टीमुळे वाया गेलेली पिके, वाढते कर्ज आणि सततच्या आर्थिक तणावाला कंटाळून शिऊर येथील शेतकरी सुभाष सूर्यवंशी यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास समोर आली. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे पावणे दोन एकर शेती असून शेती व घरखर्चासाठी सोसायटी, राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे.

घटना चौथी : कन्नड शहरातील दत्त कॉलनी परिसरातील रहिवासी छब्बू थोरात यांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे सोमवारी (८ डिसेंबर) पहाटे समोर आले. ते व त्यांची पत्नी रविवारी रात्री जेवणानंतर घरात झोपी गेले. पहाटे ३ च्या सुमारास छब्बू यांनी घराच्या छताला गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले.  त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी मदतीसाठी धावून आले. कन्नड शहर पोलिसांना कळवल्यानंतर सहायक फौजदार नासेर पठाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. थोरात यांना फासावरून काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी रुक्सार खान यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. थोरात यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, जावई असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार मोईस बेग करीत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software