वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेरूळ येथे नमाज सुरू असताना महापुरुषांच्या नावाने घोषणाबाजी केल्याप्रकरणी शनिवारी (२१ मार्च) सायंकाळी नागेश्वर महाराज, विष्णू महाराज, संदीप देवकर, अनिल पवार (सर्व रा. वेरूळ, ता. खुलताबाद) यांच्यासह अज्ञात ३०-३५ जणांविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय घडलं...
वरिष्ठ पोलीस अधिकारीक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरूळमध्ये रमजान ईदनिमित्त शनिवारी मुस्लिम बांधव नमाज पठण करत होते. संशयितांसह काही जण मैदानाजवळ आले. त्यांनी अचानक महापुरुषांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर वेरूळ परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजाता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फराटे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...

Latest News

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी... फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...
टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत
गोवंशांची हत्या करणारा निघाला कुख्यात हद्दपार गुन्हेगार!, हर्सूल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software