- News
- सिटी क्राईम
- असं कसं प्रेम... विवाहित तरुणी पडली प्रेमात, भेटायला छत्रपती संभाजीनगरात, मात्र प्रियकराने दिला ऐनवे...
असं कसं प्रेम... विवाहित तरुणी पडली प्रेमात, भेटायला छत्रपती संभाजीनगरात, मात्र प्रियकराने दिला ऐनवेळी हात... सिडको बसस्थानकावर नक्की काय झालं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तंत्रज्ञान जितके प्रगती घडवतेय, तितकेच ते मानवी नितीमूल्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. स्वैराचार, अनैतिकता वाढत चालली आहे. पती, दोन मुली असा सुखी संसार सुरू असताना यवतमाळची २४ वर्षीय तरुणी सोशल मीडियावरून छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी पती अन् मोठी मुलगी सोडली अन् छोट्या मुलीला घेऊन थेट तिने चक्क छत्रपती संभाजीनगर गाठले. पण प्रियकराने ऐनवेळी हात दिला, तो तिला भेटायला आलाच नाही. दामिनी पथकाने तरुणीला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
यवतमाळची २४ वर्षीय विवाहिता पल्लवी (नाव बदलले आहे) सोशल मीडियावरून एका तरुणाच्या संपर्कात आली. संवाद वाढून दोघांत ऑनलाइन प्रेमसंबंध जुळले. त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक सुरू केले. प्रियकराशी बोलण्यात अडथळा होऊ लागल्याने ती छोट्या मुलीला सोबत घेऊन आई-वडिलांकडे माहेरी आली. मोठी मुलगी आणि पतीला सोडून माहेरी राहू लागली. तिचे आई-वडील तिला पतीकडे जाण्यासाठी समजावून सांगत होते. मात्र त्यांचे न ऐकता पल्लवी तीन वर्षांच्या मुलीसह थेट छत्रपती संभाजीनगर शहरात आली. सिडको बसस्थानकावर उतरली. मात्र प्रियकर चक्क तिच्या ‘कव्हरेज क्षेत्रा’च्या बाहेर गेला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
By City News Desk
चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला पतीची बेदम मारहाण, आंबेलोहळची घटना
By City News Desk
Latest News
21 Mar 2026 15:57:27
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा...

