- News
- सिटी क्राईम
- १२ वी पास राहुल युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भलिंगनिदान शिकला अन् गैरधंदा उघडला, पिसादेवीजवळ पोलिसांन...
१२ वी पास राहुल युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भलिंगनिदान शिकला अन् गैरधंदा उघडला, पिसादेवीजवळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नारेगावमधील अवैध गर्भपात प्रकरणात आणखी दोघांना सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (२० मार्च) पिसादेवी परिसरात अटक केली आहे. राहुल माणिक झोंड (वय २६, रा. मयूर पार्क) आणि त्याचा साथीदार सोमनाथ परसराम बारासे (वय ३१, रा. न्यू हनुमाननगर, कमळापूर फाटा, वाळूज एमआयडीसी) अशी त्यांची नावे आहेत. राहुलने विदेशी बनावटीचे पोर्टेबल एक्सरे मशीन ऑनलाइन खरेदी करून गर्भलिंगनिदानाचा धंदा उघडला होता. दोघांकडून मशीन, एक टॅब आणि कार जप्त करण्यात आली आहे.
अनधिकृत गर्भपात रॅकेटचा तपास करत असतानाच पोलिसांना राहुलबद्दल कळले. त्यांनी डमी पती-पत्नीच्या माध्यमातून राहुलशी संपर्क केला व गर्भलिंग निदान करण्याबाबत विचारले. राहुलने २५ हजार रुपये सांगून पिसादेवी परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे राहुल आणि त्याचा साथीदार कारने पिसादेवी परिसरात आले. डमी दाम्पत्याने त्यांची भेट घेताच पोलिसांनी झडप घातली. दोघांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने पोलीस अंमलदार गणेश डोईफोडे, देविदास काळे, मुकुंद सोनवणे, गौरी भंडारी, होमगार्ड नदीम पठाण, सुवर्णा लाखूळकर यांनी केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
By City News Desk
Latest News
22 Mar 2026 18:07:44
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...

