बोलेरो अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, ८० फूट फरपटत नेले, ६२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर, बिडकीनजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलांच्या वादानंतर संतापलेल्या एकाने मुलाला सोबत आणून थेट ६२ वर्षीय वृद्धाच्या अंगावर बोलेरो गाडी चढवली. ८० फूट फरपटत नेले. यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोगेश्वरी- लामगव्हाण (ता. पैठण) येथे घडली. बिडकीन पोलिसांनी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोती रामराव जाधव (वय ६२, रा. जोगेश्वरी- लामगव्हाण, ता. पैठण) यांचा जबाब बिडकीन पोलिसांना नोंदवला. त्यांच्यावर सध्या सिग्मा हॉस्पिटलच्या आयसीयूत उपचार सुरू आहेत. जबाबात जाधव यांनी म्हटले आहे, की गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्या मुलाचा आणि गावातील बद्रीनाथ जाधव यांच्या मुलाचा शेतात वाद झाला होता. हा वाद जागेवरच मिटला होता. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आदर्श किराणा दुकानाच्या बाजूला रोडच्या कडेला मोती जाधव हे उभे होते. त्यावेळी बोलेरो गाडी (क्र.एमएच १६ एटी ४७१९) भरधाव आली.

ती गाडी विवेक बद्री जाधव चालवत होता. त्याच्या बाजूला त्याचे वडील बद्री जाधव बसलेले होते. बद्री जाधवने मोती जाधव यांच्याकडे हात दाखवत विवेकला इशारा केला. त्याचवेळी विवेकने बोलेरो गाडी मोती जाधव यांच्या दिशेने घेतली. त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली. मोती जाधव यांना गाडीने ७० ते ८०  फूट फरपटत नेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर ते दोघेही गाडीतून उतरून पळून गेले. ग्रामस्थांनी व नातेवाइकांनी धावून मोती जाधव यांना आधी हेडगेवार हॉस्पिटल, नंतर सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक नीलेश शेळके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...

Latest News

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी... फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...
टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत
गोवंशांची हत्या करणारा निघाला कुख्यात हद्दपार गुन्हेगार!, हर्सूल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software