टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर ९ इंचाचा चाकू घेऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला सिडको पोलिसांनी धाव घेऊन पकडले. ही घटना गुरुवारी (१९ मार्च) साडेसातच्या सुमारास घडली. शेख मुस्तफा उर्फ सोनू शेख मुबारक (वय २१, रा. भारतनगर पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेजमागे गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

पोलीस अंमलदार सुरेश डक यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर कामाला असलेल्या विनोद अव्हाड यांनी सिडको पोलिसांना कळवले, की एक व्यक्ती पेट्रोलपंपावर धिंगाणा घालत आहे. त्यामुळे सहायक फौजदार सुभाष शेवाळे, पोलीस अंमलदार विशाल सोनवणे, सुरेश डक हे तातडीने तिथे पोहोचले. तिथे मुस्तफा हा हातात धारदार चाक घेऊन दहशत निर्माण करत होता. त्याला पोलिसांनी जागेवरच पकडले. त्याच्याकडील ९ इंचाचा चाकू पोलिसांनी जप्त केला. मुस्तफाला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अनिल पवार करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...

Latest News

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी... फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...
टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत
गोवंशांची हत्या करणारा निघाला कुख्यात हद्दपार गुन्हेगार!, हर्सूल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software