छत्रपती संभाजीनगरात गॅस एजन्सीधारकांचे टेंशन वाढले!; एजन्सीला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी सुरू, गॅस सिलिंडर पुरवठा अर्ध्यावर आल्याने एजन्सीसमोर रांगा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठाही अर्ध्यावर आल्याने एजन्सीधारकांचे टेंशन वाढले आहे. एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. गर्दी नियंत्रित करताना नाकीनऊ येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गॅस सिलिंडर वितरकांनी आता पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ७७ गॅस एजन्सी असून, ११ लाख ७७ हजार ७४३ घरगुती गॅसधारक आहेत. रोज सरासरी २० हजार ३५० सिलिंडर लागतात. सध्या २ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. रोजची गरज २९० टन गॅसची असताना दोन दिवसांपासून १५० टनच गॅसचा पुरवठा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासन गॅस सिलिंडर पुरवठा नियमित सुरू असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळे आहे. ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मोठी टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी (२० मार्च) गॅस वितरकांची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर गॅस एजन्सीला सुरक्षा पुरवण्याचे नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी
हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र, सध्या घरगुती वापराच्या गॅसला प्रशासनाचे प्राधान्य आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत धोरण ठरलेले नसल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले. पुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी संयम राखावा आणि एजन्सीवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...

Latest News

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी... फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...
टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत
गोवंशांची हत्या करणारा निघाला कुख्यात हद्दपार गुन्हेगार!, हर्सूल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software