महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (२० मार्च) हडको एन १२ येथील स्वामी विवेकानंद उद्यानात आणण्यात आला. नियोजित चबुतऱ्यावर पुतळा बसविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लवकरच पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

चिकलठाणा येथील मडिलगेकर आर्ट गॅलरीत हा १६ फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आला. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींनी दुपारी अडीचला पुतळ्याची पाहणी करून पूजन केले. नंतर क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याला उघड्या ट्रकमध्ये ठेवून हडकोत आणण्यात आले. हडकोतील जैस्वाल हॉलजवळ पुतळा आणल्यानंतर तिथून शोभायात्रा काढण्यात आली. वाजत गाजत पुतळा टीव्ही सेंटरमार्गे स्वामी विवेकानंद उद्यानाच्या बाजूला असलेल्या नियोजित जागेवर रात्री ८ वाजता आणण्यात आला. शोभायात्रेत नगरसेवक सचिन खैरे, विश्वनाथ स्वामी, वीरभद्र गादगे, आर्किटेक्ट सचिन संगशेट्टी, ज्ञानेश्वर खर्डे, गुरुपाद पडशेट्टी, शिवा गुळवे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...

Latest News

फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी... फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची हत्या सुरूच, पोलिसांच्या छाप्यात एकाला पकडले, दुसरा फरारी...
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...
टीव्ही सेंटरजवळील पोलीस पेट्रोलपंपावर तरुणाचा राडा, ९ इंचाचा चाकू घेऊन माजवली दहशत
गोवंशांची हत्या करणारा निघाला कुख्यात हद्दपार गुन्हेगार!, हर्सूल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software