‘आम्ही स्वखुशीने गेलो, आम्ही मजाही केली...’; कृष्णा डोणगावकरांनी संजय निकमांना तोंडघशी पाडलं!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे आम्ही सर्व ९ सदस्य सहलीवर स्वखुशीने गेलो. तेथे आम्ही मजाही केली... असे सांगत जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर आणि अन्य सहा सदस्यांनी शुक्रवारी (२० मार्च) संजय निकम यांना तोंडघशी पाडले. निकम यांनी अंबादास दानवे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक १८ मार्चला झाली. निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी भाजपचेच जितेंद्र जैस्वाल बिनविरोध विजयी झाले. या निवडणुकीवर शिंदे गटाने बहिष्कार टाकला होता, तर ठाकरे गटाच्या सर्व ९ सदस्यांना निवडणुकीत सहभागी न होण्यासाठी पक्षाचे व्हिप जारी केला होता. निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे नऊही सदस्य सहलीवर गेले होते. सहलीवर असताना संजय निकम आणि ललिता सोनवणे हे दोन सदस्य फुटल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. संजय निकम यांनी गुरुवारी (१९ मार्च) पत्रकार परिषद घेऊन दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी ठाकरे गटाच्या सदस्यांचा १८ कोटी रुपयांत सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वतः हडपले. आम्हाला १० ते १७ मार्च या कालावधीत इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेतले होते, असे निकम यांनी सांगून खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर दानवे यांच्या बचावासाठी ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर, केतन काजे, कल्याण सुभाष गायके, मनोज पेरे, सुनंदा चव्हाण आणि विद्या रमेश गायकवाड हे शुक्रवारी एकत्र आले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निकम यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. शिंदे गट आणि भाजपच्या संघर्षात सत्तेत सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी एकत्र गोव्याच्या सहलीवर गेलो. दानवे यांनी आम्हाला ओलीस ठेवल्याच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. कारण आम्ही सर्व सदस्य तेथे मजा-मस्ती करीत होते. याची छायाचित्रेही या सदस्यांनी पत्रकारांना दाखविली. सदस्यांचा सौदा केल्याचा आरोपही बिनबुडाचा असून, शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे आम्हाला काही पदे देण्यासाठी चर्चा केली होती, असे ते म्हणाले. संजय निकम आणि ललिता सोनवणे आम्हाला सोडून पसार झाले होते. यामुळे आमची राजकीय गणिते हुकली, असे डोणगावकर म्हणाले.

कृष्णा डोणगावकर खोटे बोलत असून, शिंदे गटासोबत गेल्यावर त्यांनाच पद होते. आम्ही सहलीवर गेलो, तेव्हा हॉटेलमध्ये सोय करण्यासाठी ठाण्याचे शिंदे गटाचे नगरसेवक होते. प्रत्येकाची टोकन रक्कमही त्यांच्याकडे येऊन पडली होती. हे आम्हाला मान्य नव्हते.
-संजय पाटील निकम, जि.प. सदस्य, ठाकरे गट

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक

Latest News

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा...
छत्रपती संभाजीनगरात गॅस एजन्सीधारकांचे टेंशन वाढले!; एजन्सीला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी सुरू, गॅस सिलिंडर पुरवठा अर्ध्यावर आल्याने एजन्सीसमोर रांगा
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
बोलेरो अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, ८० फूट फरपटत नेले, ६२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर, बिडकीनजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर शहरात भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त आज सायंकाळी शोभायात्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software