हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३ बैल वाचवले. त्याआधी कत्तल केलेल्या गोवंशांचे १ लाख १२ हजार रुपयांचे मांस जप्त केले. कत्तल करणाऱ्या दोघांना पकडून हर्सूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी (२० मार्च) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार संदीप तायडे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.  ते शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या पथकात तैनात आहेत. शुक्रवारी (२० मार्च) दुपारी पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस अंमलदार कैलास काकड, मनोज निखनकर, विजय निकम, बाळू नागरे, निहाल सोनटक्के, दिनकर आवारे, शारुख शेख, रोहित जाधव, महिला पोलीस अंमलदार पूजा भोसले, पूजा इंगळे, गिता शिकारे, चालक पोलीस अंमलदार दत्तात्रय गरड हे गस्तीवर होते. टीव्ही सेंटर परिसरात आले असता पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीत बाबा कुरेशी हा त्याच्या सानिया बिफ शॉपमधून गोवंश मांस विक्री करत आहे. त्याच्याच बाजूच्या प्लॉटमध्ये गोवंशांची कत्तल करत आहे.

ही माहिती संदीप काळे यांनी पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना दिली. त्यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळताच पोलीस पथकाने दुपारी ३ च्या सुमारास जहाँगिर कॉलनीत धडक दिली. सानिया बिफ दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानात दोन जण मिळून आले. त्यांची नावे बाबा कुरेशी सुलेमान कुरेशी (वय ४२, रा. जहाँगिर कॉलनी हर्सूल) व  आरबाज ईजाज कुरेशी (वय २८, रा. सिल्लेखाना नटराज दुकानामागे) असल्याचे समोर आले. बाबा कुरेशी याने दुकान त्याच्या मालकीचे असून बिफ मांस विक्री करण्याचा महानगरपालिकेचा परवाना असल्याचे सांगितले. अरबाज कुरेशी त्याच्याकडे कामगार असल्याचे सांगितले. दुकानातील मांसाबाबत विचारणा केली असता, हे गोमांस असल्याची कबुली त्याने दिली.

बाजूला असलेल्या प्लॉटमध्ये गोवंश कत्तल करून विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितल्याने प्लॉटमध्ये पोलिसांनी पाहणी केली असता तीन गोवंश जातीचे बैल अमानुष व निर्दयीपणे बांधलेले, एका मोठ्या कढईत गोवंश जनावरांची चरबी वितळण्यासाठी ठेवलेली, एका गोणीत आतडे व एका निळ्या रंगाचे पाण्याच्या ड्रममध्ये गोवंश जातीचे जनावरांचे पायाचे अर्धवट तुकडे भिजवत ठेवल्याचे दिसले. कत्तल करण्यासाठी चार लोखंडी कुऱ्हाडी मिळून आल्या. पोलिसांनी १ लाख १६ हजार रुपयांचे गोवंश मांस, दीड लाख रुपयांची रुपयांचे ३ बैल, १० हजार रुपयांचा मोबाइल, २ हजार रुपयांच्या कुऱ्हाडी असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही बैल चिकलठाणा येथील महावीर गोशाळेत पाठविण्यात आले. बाबा कुरेशी व अरबाज कुरेशी यांच्याविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस अंमलदार निर्मला कोलते करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक

Latest News

हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक हर्सूलच्या जहाँगीर कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, गोवंशांचे सव्वा लाखाचे मांस जप्त, ३ बैल वाचवले, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जहाँगिर कॉलनीतील गोवंशांची हत्या केल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा...
छत्रपती संभाजीनगरात गॅस एजन्सीधारकांचे टेंशन वाढले!; एजन्सीला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी सुरू, गॅस सिलिंडर पुरवठा अर्ध्यावर आल्याने एजन्सीसमोर रांगा
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
बोलेरो अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, ८० फूट फरपटत नेले, ६२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर, बिडकीनजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर शहरात भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त आज सायंकाळी शोभायात्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software