विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रूक येथे शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी समोर आली. ज्योती योगेश इंगळे (रा. गोळेगाव बुद्रूक) असे विवाहितेचे नाव आहे.

शुक्रवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी ६ पासून ज्योती घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीय त्यांना शोधत असताना शनिवारी गावाजवळीलच शेतातील विहिरीजवळ त्यांची चप्पल आढळली. अजिंठा पोलिसांनाही कळविण्यात आले. विहिरीत पाणी जास्त असल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून ज्योती इंगळे यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. ज्योती यांच्या पश्चात पती, एक ११ वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली आहे. त्यांनी आत्‍महत्‍या केली, अपघाताने त्या विहिरीत पडल्या, याचा तपास केला जात आहे.

पैठणमध्ये जायकवाडीच्या डाव्या कॅनॉलमध्ये आढळला मृतदेह
पैठण तालुक्यातील इंदेगाव शिवारातील डाव्या कालव्यातील पाण्यावर तरंगताना अर्जुन गायकवाड (वय ४० वर्षे, रा. करंजखेड, ता. पैठण) यांचा मृतदेह शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी २ च्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची नोंद पैठण पोलिसांनी घेत तपास सुरू केला आहे. उद्धव नवथर यांच्या शेताजवळील जायकवाडी धरणाच्या डाव्या कॅनॉलमध्ये मृतदेह काही जणांना तरंगताना दिसला. पोलीस पाटील शिखा रंगनाथ हुबे यांनी पैठण पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अर्जुन यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर अपघाती मृत्यू आहे की हत्या की आणखी काही, हे समोर येईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software