- Marathi News
- सिटी क्राईम
- सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हैदराबादला विकण्याआधीच छ. संभाजीनगरमध्ये टोळी पकडली!, मोठ्या र...
सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हैदराबादला विकण्याआधीच छ. संभाजीनगरमध्ये टोळी पकडली!, मोठ्या रॅकेटची शक्यता

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गुजरातमधून सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हैदराबादच्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी नेत असताना चौघांच्या मुसक्या छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर आवळण्यात पोलिसांना यश आले. शहर गुन्हे शाखेने गुजरात पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (३१ जुलै) ही कारवाई केली. मानवी तस्करीचे मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

रेल्वेत बसण्याआधीच पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अपहरकर्त्यांपैकी तिघांना पकडले. चिमुकलीची सुखरुप सुटका केली. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला, करमाडजवळ त्याने रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. जयेशविरुद्ध यापूर्वीही अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तो मानवी तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. समाधान नाशिकचा केटरिंग व्यावसायिक असून, जयेशसोबत ओळख झाल्यानंतर त्याने त्याच्या हैदराबादच्या परिचयातील व्यापाऱ्यासाठी मुलीची मागणी केली. दीड लाख रुपयांत मुलगी चोरून हैदराबादपर्यंत पोहोचवण्याचे त्यांच्यात ठरले होते. मात्र पोलिसांनी वेळीच सर्वांच्या मुसक्या आवळल्या.