प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राजरोस संबंध ठेवले. तिने लग्‍नाची मागणी करताच संतापलेल्या प्रियकराने बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने तरुणीला बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना बुधवारी (३० जुलै) वाळूज एमआयडीसीतील कमळापूरमध्ये समोर आली आहे. यात तरुणीच्या उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून, तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिचा प्रियकर व त्‍याचा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रियकर दत्तू रामचंद्र दुबिले आणि त्याचा मित्र योगेश इथापे (दोघे रा. जोगेश्वरी, गंगापूर) अशी संशयितांची नावे आहेत. २७ वर्षीय तरुणी पतीपासून विभक्‍त रांजणगाव शेणपुंजीतील नर्सरी कॉलनीत दोन मुले आणि आईसह राहते. ती खासगी नोकरी करते. चार वर्षांपूर्वी तिची दत्तूसोबत ओळख झाली. ओळखीतून मैत्री झाली. नंतर त्याने ‘तुला व मुलांना सांभाळतो, घर देतो,’ असे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघे एकत्र राहू लागले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दत्तू तिच्यावर संशय घेऊन मारहाण आणि शिवीगाळ करत होता. बुधवारी रात्री साडेआठला तरुणी घराशेजारील किराणा दुकानावर गेली असताना दत्तू व त्याचा मित्र योगेश दुचाकीने आले.

तुला घर दाखवतो, असे म्हणत त्यांनी तिला दुचाकीवर बसवले आणि कमळापूर परिसरातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे डांबून ठेवत तिला कमरेचा बेल्ट व कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तुला घर हवे आहे का?, असे म्हणत तो बेदम मारहाण करत होता. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारीन, अशी धमकी तरुणीला दिली. घाबरलेल्या तरुणीने दुसऱ्या दिवशी सकाळी आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघी मायलेकी पोलीस ठाण्यात आल्या. पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. तिच्या तक्रारीवरून दत्तू आणि योगेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Latest News

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...
पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना
छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण
त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून
Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software