वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी-जोगेश्वरी रस्‍त्‍यावर गुरुवारी (३१ जुलै) दुपारीसाडेचारच्या सुमारास मद्यधुंद क्रूझरचालकाने थरार घडवला. दोन दुचाकी, एक कार व एक अन्य क्रूझर आणि रिक्षाला धडक दिली. धडक बताच रिक्षा उलटून ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी झाला. पोलिसांनी लगेचच घटनास्‍थळी धाव घेत मद्यधुंद चालक संजय बाबूराव कदम (वय ४०, रा. जोगेश्वरी, वाळूज एमआयडीसी) याला ताब्‍यात घेतले.

संजय कदम हा क्रूझर घेऊन एमआयडीसीतून जोगेश्वरीकडे सुसाट निघाला होता. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका गयाबाई शिरवत (वय ५४, रा. ए. एस. क्लब), अपर्णा निंबोरकर (वय ५४, रा. औरंगपुरा), कविता नंदन (वय ३५, रा. पडेगाव), सुजाता शिंगाडे (वय २६, रा. लासूरस्टेशन) या शाळा सुटल्याने रिक्षाने निघाल्या असता, या रिक्षाला सुसाट क्रूझरने धडक दिली. त्‍यामुळे रिक्षा उलटून चारही शिक्षिकांसह रिक्षाचालकही जखमी झाला आहे. सुजाता यांच्या पायावर रिक्षा पडली असून, अपर्णा रिक्षातून बाहेर फेकल्या गेल्याने त्‍यांना सात टाके पडले. त्यानंतर दुसऱ्या क्रूझर वाहनाला धडक देत कदमने पुढे दोन दुचाकी आणि कारला उडवले. या वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी येत चालक संजय कदम याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या थरारामुळे एकच खळबळ उडाली होती. अपघातानंतर संजय कदम हा चक्‍क क्रूझरमध्ये झोपी गेला होता. तो दारूचा व्यसनी असून, कायम दारू पिऊन घरीही भांडण करतो, असे त्‍याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Latest News

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...
पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना
छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण
त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून
Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software