पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, देवगाव रंगारीची घटना, वाळूज पंढरपूरहून परीक्षेला जाताना काळाचा घाला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीवरील नियंत्रण सुटून वेळगंगा नदीच्या पुलावरील संरक्षक कठड्याला धडकल्याने १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. ओम कडुनाथ तुपे (वय १८ वर्षे, रा. बाभूळगाव बुद्रूक ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

ओम सध्या वाळूज पंढरपूरला राहून खासगी कंपनीत काम करून शिऊर भागातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकतही होता. परीक्षेसाठी वाळूज येथून रोज दुचाकीने ये-जा करत होता. मंगळवारी सकाळी वाळूज येथून दुचाकीने (एमएच २० जीडब्लू ६८३४) कॉलेजकडे येत असताना देवगाव रंगारीजवळील वेळगंगा नदीवरील पुलाजवळील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी पुलावरील संरक्षक भिंतीला जोरात आदळली.

ओमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थ आणि देवगाव रंगारी पोलिसांनी घटनास्‍थळी धावून ओमला देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. नंतर १०८ रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. देवगाव रंगारी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. अधिक तपास सहायक फौजदार भीमराव चेळेकर, पोलीस अंमलदार केसरसिंग राजपूत करीत आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software