सुरेश बनकर स्वगृही परल्यानंतर आता दिनेश परदेशी यांचीही चर्चा सुरू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यापुरते ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर भाजपमध्ये परतले. सिल्लोडच्या या महत्त्वाच्या राजकीय घटनेनंतर आता वैजापूरमध्ये राजकीय चर्चेने जोर पकडला आहे. दिनेश परदेशी हेही भाजपात परततील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परदेशी यांनी या चर्चेला थेट खोटे ठरवले नसले तरी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यापुरते ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर भाजपमध्ये परतले. सिल्लोडच्या या महत्त्वाच्या राजकीय घटनेनंतर आता वैजापूरमध्ये राजकीय चर्चेने जोर पकडला आहे. दिनेश परदेशी हेही भाजपात परततील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परदेशी यांनी या चर्चेला थेट खोटे ठरवले नसले तरी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैजापूरचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील नेते राजू शिंदे आणि सिल्लोडमधील पदाधिकारी सुरेश बनकर यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्‍यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. मात्र तिघांचाही पराभव झाला. परदेशी यांचा शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांनी ४१ हजार ६५८ मतांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वी सुरेश बनकर हे स्वगृही दाखल झाले. त्‍यानंतर राजू शिंदे आणि दिनेश परदेशी यांची चर्चा सुरू झाली आहे. याला कारण छत्रपती संभाजीनगरची महापालिका आणि वैजापूरची नगरपालिका निवडणूक आहे.

या दोन्ही निवडणुकांत मोठ्या यशासाठी भाजपला या दोन्ही नेत्‍यांचा उपयोग होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर शहरात राजू शिंदे तर वैजापूर शहरात दिनेश परदेशी यांची ताकद आहे. त्‍यांना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. राजू शिंदे यांना भाजपमधीलच एका गटाचा विरोध असला तरी परदेशी यांच्याबाबतीत कुणाचा विरोध समोर येण्याची शक्‍यता कमी आहे. त्‍यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांच्या पत्नीही नगराध्यक्ष राहिल्या आहेत. नगर परिषदेवर परदेशी यांची पकड आहे. दरम्‍यान, याबाबत पत्रकारांशी बोलताना परदेशी म्हणाले, की लोकांत चर्चा सुरू असली तरी मी अजून निर्णय घेतलेला नाही. पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software