शेतात काम करताना विहिरीत पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू; सोयगाव तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : जंगली कोठा (ता. सोयगाव) शिवारातील शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. घटना दुर्दैवी घटना रविवारी (१९ जानेवारी) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. मुकेश धनसिंग राठोड (वय २५, रा. बोरमाळ तांडा, जंगलीकोठा) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या जंगलीकोठा […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : जंगली कोठा (ता. सोयगाव) शिवारातील शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. घटना दुर्दैवी घटना रविवारी (१९ जानेवारी) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

मुकेश धनसिंग राठोड (वय २५, रा. बोरमाळ तांडा, जंगलीकोठा) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या जंगलीकोठा शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी मुकेश गेला होता. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र बनोटी येथे शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. घटना घडली तेव्हा त्‍याचे आई-वडील ऊसतोडीला गेले होते, त्यामुळे शेतीची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या पश्चात आई, वडील, एक अविवाहित भाऊ आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software