वेरूळच्या शहाजीराजे भोसले स्मारकासाठी सुधारीत प्रस्ताव पाठवा; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ येथील मालोजीराजे यांची गढी व शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी सर्व संबंधित विभागांनी सुधारित प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य समितीकडे पाठवावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात रविवारी (१५ सप्‍टेंबर) सायंकाळी बैठक पार पडली. पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ येथील मालोजीराजे यांची गढी व शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी सर्व संबंधित विभागांनी सुधारित प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य समितीकडे पाठवावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात रविवारी (१५ सप्‍टेंबर) सायंकाळी बैठक पार पडली. पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी तसेच पुरातत्व संचालनालयाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित स्मारकासाठी जागा असली तरी ही स्मारके व मालोजीराजे यांची गढी या जागा दोन वेगळ्या असून त्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसारच प्रस्तावित स्मारकाचा आराखडा तयार करावा. ऐतिहासिक वास्तुंचे जतन व संवर्धन हे पुरातत्व विभागाच्या निर्देशांनुसार करण्यात यावे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा समावेश या आराखड्यात असावा. या सर्व सुधारणांसह लवकरात लवकर हा सुधारीत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software