मोठी बातमी : अब्‍दुल सत्तार पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, स्वतःच केली घोषणा!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकांना विकास नकोय. फक्त जातीवाद हवा आहे. निवडणुकीत शेवटच्या चार दिवसांत वातावरण बदलून जाते. मी अठरा- अठरा तास काम करतो, तरीही लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. जर असेच असेल तर मलाही राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्‍यामुळेच मी ठरवलंय की पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असा निर्णय सिल्लोडचे आमदार तथा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकांना विकास नकोय. फक्त जातीवाद हवा आहे. निवडणुकीत शेवटच्या चार दिवसांत वातावरण बदलून जाते. मी अठरा- अठरा तास काम करतो, तरीही लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. जर असेच असेल तर मलाही राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्‍यामुळेच मी ठरवलंय की पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असा निर्णय सिल्लोडचे आमदार तथा माजीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी सोमवारी (१३ जानेवारी) जाहीर केला आहे. त्‍यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कदाचित पुढच्या निवडणुकीत सत्तार हे आपल्या पुत्राला उभे करतील, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

अंभई (ता. सिल्लोड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामसंसद कार्यालयाचे भूमिपूजन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. या वेळी सत्तार भाषणात म्हणाले, की राजकारण आता दुसऱ्या मार्गाने जात आहे. असे राजकारण फार घातक आहे. मी आमदार-मंत्री असताना १८-१८ तास सालदार, महिनदारासारखे काम केले. शासकीय योजनांचा लाभ अनेक महिला, कामगारांना मिळवून दिला. मतदारसंघाचा विकास केला. सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडीसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा यासाठी पूर्णा नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली.

पण, विरोधकांना काहीच कामे न करता माझ्याबरोबरीने मतदान मिळाले. विरोधक जातीपातीवर निवडणूक लढवतात. जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जातीपातीवर निवडणुका होत असेल तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे आभार, पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही, तुला लढायची असेल, तर बघ नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र, असे अब्‍दुल सत्तार म्‍हणाले.

निवडणूक जड गेली, मंत्रीपदही नाही, त्‍यामुळे आता पुत्राच्या हाती राजकारण ?
अब्‍दुल सत्तार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तरीही मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी सत्तारांना आटापिटा करावा लागला. एवढे करूनही मंत्रिपद मिळाले नाहीच. आता पुढच्या निवडणुकीत अब्‍दुल सत्तार हे त्‍यांचे पूत्र

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पद मिळाले नाही तरी काम करत राहा, डॉ. भागवत कराडांचा नव्या प्रवेशकर्त्यांना सल्ला, म्हणाले, महापौर भाजपचाच करायचाय!; ठाकरे गटाचे उपशहप्रमुख व्यास भाजपात दाखल

Latest News

पद मिळाले नाही तरी काम करत राहा, डॉ. भागवत कराडांचा नव्या प्रवेशकर्त्यांना सल्ला, म्हणाले, महापौर भाजपचाच करायचाय!; ठाकरे गटाचे उपशहप्रमुख व्यास भाजपात दाखल पद मिळाले नाही तरी काम करत राहा, डॉ. भागवत कराडांचा नव्या प्रवेशकर्त्यांना सल्ला, म्हणाले, महापौर भाजपचाच करायचाय!; ठाकरे गटाचे उपशहप्रमुख व्यास भाजपात दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तसे ठाकरे गटातील पदाधिकारी भाजप, शिंदे गटाच्या वळचणीला...
छ. संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये स्वतंत्र आयटी पार्क उभारा, सीएमआयएची सरकारकडे मागणी
वाळूज MIDC चे API मनोज शिंदे यांची सहकाऱ्यांसह मिळून धडाकेबाज कामगिरी, २ कारवाया अन्‌ अडीच लाखांचा गुटखा जप्त, एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
वैजापूरच्या जांबरगाव टोल नाक्यावरील ऑपरेटरची मराठा आंदोलकांना अरेरावी, आक्षेपार्ह भाषा!; आंदोलकांनी टोल वसुली बंद पाडत वाहतूक केली ठप्प
छ. संभाजीनगरच्या शासकीय दंत रुग्णालयात घडला विचित्र प्रकार : २२ वर्षीय तरुणाने चक्क सुईच गिळली!; पुढे काय घडलं वाचा...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software