भरधाव ट्रॅक्‍टरने घेतला चिमुकल्याचा बळी; दुचाकीला धडक, पित्‍याची प्रकृती गंभीर, पैठण तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले. यात सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्‍याचे वडील जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (१२ जुलै) दुपारी एकच्या सुमारास पाचोड ते विहामांडवा रोडवरील चौंढाळा गावाजवळ घडली. आर्यक्य नितीन चव्हाण (वय ६, रा. खंडाळा, ता. पैठण) मृत्‍यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, त्‍याचे वडील नितीन रहिमान चव्हाण (वय […]

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले. यात सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्‍याचे वडील जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (१२ जुलै) दुपारी एकच्या सुमारास पाचोड ते विहामांडवा रोडवरील चौंढाळा गावाजवळ घडली. आर्यक्य नितीन चव्हाण (वय ६, रा. खंडाळा, ता. पैठण) मृत्‍यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, त्‍याचे वडील नितीन रहिमान चव्हाण (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत.

चिमुकल्याला सोबत घेऊन नितीन चव्हाण हे कामानिमित्ताने विहामांडवा येथे गेले होते. दुपारी विहामांडवा येथून गावाकडे परतत असताना केकत जळगाव येथून विहामांडव्याकडे येणाऱ्या ट्रॅक्‍टरने त्‍यांना धडक दिली. यात बापलेक जखमी झाले. दोघांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी आर्यक्‍यला तपासून मृत घोषित केले. नितीन यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताला कारणीभूत ट्रॅक्‍टरचालकाला अटक करण्यासाठी महिलांनी ग्रामीण रुग्णालयासमोर आक्रमक पवित्रा घेतला होता. तोपर्यंत बालकाचा मृतदेत ताब्‍यात घेणार नाही, असा इशारा त्‍यांनी दिला. अर्धनग्न होत टाहो फोडला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software