- News
- जिल्हा न्यूज
- पैशांनी भरलेले एटीएम घेऊन चोरटे धडकले शेतवस्तीवर!; वैजापूरमध्ये पुढे घडला हा थरारक सीन…
पैशांनी भरलेले एटीएम घेऊन चोरटे धडकले शेतवस्तीवर!; वैजापूरमध्ये पुढे घडला हा थरारक सीन…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाशिकच्या मालेगाव येथील सटाणा रस्त्यावरील इंडसलँड बँकेचे अख्खे एटीएम मशिनच उचलून चोरटे स्कॉर्पिओमधून नेत होते. वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात ते आले असता पोलिसांची गस्तीवरील जीप येत असल्याचे पाहून त्यांनी स्कॉर्पिओ या भागातील एका शेतवस्तीवर नेली. तिथे शेतकऱ्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे १५-२० शेतकरी जमा झाले. त्यांना पाहून चोरट्यांची पळापळ […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाशिकच्या मालेगाव येथील सटाणा रस्त्यावरील इंडसलँड बँकेचे अख्खे एटीएम मशिनच उचलून चोरटे स्कॉर्पिओमधून नेत होते. वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात ते आले असता पोलिसांची गस्तीवरील जीप येत असल्याचे पाहून त्यांनी स्कॉर्पिओ या भागातील एका शेतवस्तीवर नेली. तिथे शेतकऱ्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे १५-२० शेतकरी जमा झाले. त्यांना पाहून चोरट्यांची पळापळ झाली. त्यांनी स्कॉर्पिओ तिथेच सोडून पळ काढला. त्यातील दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडलेच. पैशांनी भरलेले एटीएम शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. ही थरारक घटना गुरुवारी (११ जुलै) पहाटे घडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
By City News Desk
Latest News
06 Mar 2026 21:18:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...

