जायकवाडीचे १२ दरवाजे उघडले!; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण सोमवारी (९ सप्‍टेंबर) दुपारी ९७.६९ टक्के भरल्याने दुपारी साडेबाराला ६ दरवाजे, तर सायंकाळी सातच्या सुमारास आणखी ६ दरवाजे असे एकूण १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. त्यामधून नदी पात्रात ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरण सोमवारी (९ सप्‍टेंबर) दुपारी ९७.६९ टक्के भरल्याने दुपारी साडेबाराला ६ दरवाजे, तर सायंकाळी सातच्या सुमारास आणखी ६ दरवाजे असे एकूण १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. त्यामधून नदी पात्रात ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवणारे जायकवाडी धरण मराठवाड्यातील लाखो एकर शेतीसाठी वरदान आहे. यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. पण, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नंतर झपाट्याने पाण्याची आवक धरणात वाढली. जलसाठा दुपारी १२:३० च्या सुमारास ९७.६९ टक्‍के झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडकर, गणेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून १०, २७, १८, १९, १६ व २१ असे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ३ हजार १४४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजता १४, २३, १२, २५, ११ व २६ असे आणखी ६ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण १२ दरवाजे उघडून नदीपात्रातून एकूण ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software