अजित सीड्‌स कंपनीत कामगाराची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; बिडकीनजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन परिसरातील फारोळा येथील अजित सीड्‌स कंपनीत वैभव युवराज पवार (वय २४, रा. निमगाव, ता. पैठण) या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१५ ऑक्‍टोबर) सकाळी समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. वैभव वर्षभरापासून अजित सीड्‌स कंपनीत काम करत होता. कंपनीमधील कामगारांसाठी असलेल्या रूममध्ये तो राहत होता. दसरा […]

पैठण/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन परिसरातील फारोळा येथील अजित सीड्‌स कंपनीत वैभव युवराज पवार (वय २४, रा. निमगाव, ता. पैठण) या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१५ ऑक्‍टोबर) सकाळी समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

वैभव वर्षभरापासून अजित सीड्‌स कंपनीत काम करत होता. कंपनीमधील कामगारांसाठी असलेल्या रूममध्ये तो राहत होता. दसरा सणाच्या निमित्ताने त्याच्यासोबत राहणारे इतर कामगार गावी गेले होते. वैभव एकटाच खोलीत होता. तीन दिवसांपूर्वी त्याने आधी विष पिले. नंतर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येत असल्याने कंपनीतील काही कामगारांनी खोलीत जाऊन पाहिले असता वैभव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बिडकीन पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात आणला. बिडकीन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वैभवच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे. त्‍याच्या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

घाटशेंद्र्यात तरुणाची आत्‍महत्‍या
कन्‍नड तालुक्‍यातील घाटशेंद्रा येथे अशोक साहेबराव बनकर (वय ३५) याने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. तो आईसह राहत होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घरात झोपायला जातो असे सांगून तो घरात गेला. सायंकाळी साडेसात वाजले तरी अशोक घराबाहेर न आल्याने आईने जाऊन पाहिले असता त्‍याने गळफास घेतल्याचे दिसले. त्‍याच्या पश्चात आई, पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आत्‍महत्‍येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software