रांजणगाव शेणपुंजीजवळ शॉर्टसर्किटने आग, पाल ठोकून राहणाऱ्या नागरिकांचे संसारसहित्य खाक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीजवळ मोकळ्या जागेत काही जण पाल ठोकून राहत होते. आज, ८ डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमारास वरून गेलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन ठिणगी एका पालवर पडली आणि आग भडकून ४ पाल (घरे) जळून खाक झाले. एका पालमध्ये असलेल्या ३ पैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. ८ पाल होते, पैकी ३ सुरक्षित राहिले.

परिसरातील कंपन्यांत मिळेल ते काम करून ८ कुटुंब राहत होते. त्यांचे संसार साहित्य आगीत जळून खाक झाले. वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन काही मिनिटांत आग विझवली. आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी राजेश घरत, अनिल देशमुख, एल. जी. ब्राह्मणकर, एस. जी. वासनिक यांच्यासह जवान सुनील पाटील, वाय. डी. काळे, एस. के. गायकवाड, सी. एस. पाटील, एन. जी. पारखे, पी. एस. खाडे, एस. व्ही. दाभाडे, डी. एस. काळे यांनी प्रयत्न केले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software