निवृत्तीवेतनधारकांनो, हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा कोषागार कार्यालयात सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आपला हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करावा, असे आवाहन सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ. बुरकुळे यांनी केले आहे.

अशा प्रकारे सादर करता येईल हयातीचा दाखला
-निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँकेत जाऊन यादीतील आपले नाव शोधून शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. पुनर्नियुक्तीची माहिती, आधार क्रमांक, पॅन क्रमांक व मोबाईल क्रमांक यांची नोंद करावी.
-बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी http://jeevanpramaan.gov.in  या संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध आहे. परदेशात राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात पाठवता येईल.
-भारतीय डाक विभागाच्या Indian Post Payment Bank (IPPB) मार्फत सशुल्क डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
ज्यांची स्वाक्षरी अथवा अंगठा उमटवलेला नसेल किंवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल, त्यांचे डिसेंबर २०२५ चे निवृत्तीवेतन शासन निर्णयानुसार थांबविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.  वय वर्षे ८० वर्षांवरील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या वयाबाबतचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र) १५ डिसेंबर पूर्वी वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा, असेही सुषमा बुरकुळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software