महिलांकडून कायद्याचा गैरवापर, जागतिक पुरुष दिनी ‘पत्नीपीडितांचे शीर्षासन’, छत्रपती संभाजीनगरच्या करोडीतील अनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष (पहा व्हिडीओ)

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आज, १९ नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो. वाळूजजवळील करोडीजवळ पत्नी पीडित पुरुष आश्रम आहे. या आश्रमात सकाळी १० ला पुरुषांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शीर्षासन आंदोलन करण्यात आले. महिलांकडून कायद्याच्या होणाऱ्या गैरवापराकडेही लक्ष वेधण्यात आले.

८ मार्चला जागतिक महिला दिन देशभर उत्साहाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे, यात पुरुष कोणताही भेद न करता सहभागी होतात. जागतिक पुरुष दिनाशी मात्र कुणाला काही देणेघेणे नसते. संविधानानुसार स्त्री-पुरुष समान असूनही अनेक कायदे, नियम आणि सरकारी धोरणे केवळ महिलांच्या बाजूने झुकलेली असल्यामुळे पुरुषांवरील अन्याय वाढत आहेत. काही महिलांकडून कायद्यांचा गैरवापर वाढला आहे. यामुळे पुरुष मानसिक, सामाजिक, आर्थिक संकटात सापडत आहेत. अनेक पुरुष हताश होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. विवाहसंस्था ढासळली असून लग्न करणे म्हणजे जणू गुन्हा केल्यासारखे झाले आहे. पवित्र विवाहबंधनाचे व्यवसायात रूपांतर होत असल्याचे दिसते. संयुक्त कुटुंब व्यवस्था मोडीत निघत आहे.

पुरुषांवर अत्याचार, त्रास, खोट्या तक्रारी यासारख्या समस्या वाढत असल्या तरी त्याकडे समाज, पोलीस किंवा न्यायव्यवस्था गांभीर्याने पाहात नाहीत. पुरुषांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठच नाही. त्यामुळे सरकार, यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पत्नीपीडितांनी शीर्षासन आंदोलन केले. शासन आमच्या वेदना ऐकत नाही म्हणून आम्हीच उलटे झालो, असे सांगत पत्नीपीडितांनी शीर्षासन करून जागतिक पुरुष दिन साजरा केला. याद्वारे लिंगनिरपेक्ष, न्याय्य आणि समान कायदे करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी आश्रमाचे अध्यक्ष ॲड. भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, भाऊसाहेब साळुंके, वैभव घोळवे, सोमनाथ मणाळ, संजय भांड, उमेश दुधाट पाटील आदींसह अनेक पत्नीपीडित पुरुष उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software