छत्रपती संभाजीनगरच्या तरुणींना महापालिका देणार पोलीस भरतीचे प्रशिक्षण, खासगी केंद्रचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला चांगला पर्याय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाने शहरातील १८ ते ३३ वयोगटातील मुली व महिलांना पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी अर्ज मागवले आहेत. लेखी व मैदानी चाचणी घेऊन महिला, मुलींची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

सध्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रांकडून तरुण, तरुणींची अक्षरशः आर्थिक लूट होत असते. अनेक केंद्रांकडे तर स्वतःचे मैदानसुद्धा नाही. केंद्रांचे अव्वाच्या सव्वा शुल्क भरणे सर्वांनाच शक्य होत नाही. सध्या राज्यात १५ हजार ६३१ पदांसाठी पोलीस भरती होत असून, या भरतीमुळे खासगी प्रशिक्षण केंद्रचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी आणि गरीब विद्यार्थिनी भरतीपासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रशिक्षणादरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मुलाखत या सर्व स्तरांवर मार्गदर्शन केले जाईल. अर्जासोबत रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागतील. निवड झालेल्या उमेदवारांना नाममात्र १० टक्के (२,५०० हजार रुपये) शुल्कासह नियोजित ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात होणाऱ्या भरतीत सर्वाधिक मुलींची संख्या छत्रपती संभाजीनगर शहरातून असावी यासाठी प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software