विद्यापीठात उद्या केंद्रीय ‘आविष्कार'चे उद्‌घाटन; सहा गटांत ६२१ संशोधक सहभागी होणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रयोगांना वाव देणाऱ्या संशोधकांच्या आविष्कारचे आयोजन ३ व ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या संशोधन व जिज्ञासूवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राजभवनच्या वतीने राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यापूर्वी ही विद्यापीठस्तरीय स्पर्धा होत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी १०ः३० वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या वेळी प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. संजय साळुंके, नितीन जाधव यांची उपस्थिती राहील. दोन दिवस या प्रयोगांचे सादरीकरण नाट्यशास्त्र विभागातील नवीन सभागृहात होईल. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक उद्योजक विवेक देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी चारला होणार आहे. या प्रयोगाला भेट द्यावी, असे आवाहन ‘आविष्कार’चे समन्वयक डॉ.भास्कर साठे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले आहे.

सहा गटांत ६२१ संशोधक सहभागी होणार
प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेले टॉप थ्री संघ हे केंद्रीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जिल्हास्तरावर केवळ पदवीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार घेण्यात आली. यामधील विजेते आणि पदव्युत्तर पदवी व पदवी तर पदव्युत्तरनंतरची पदवी या स्तरातील स्पर्धा थेट केंद्रीय स्तरावर होणार आहे. ही स्पर्धा सहा गटांत होईल. यामध्ये मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधी, विज्ञान शाखा, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र. स्पर्धेसाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली. चार जिल्ह्यांत मिळून ६२१ संशोधक विद्यार्थी आहेत. यामध्ये २५३ मुले तर ३६८ मुलींचा समावेश आहे, अशी माहिती डॉ.प्रवीण यन्नावार यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software