हरसिद्धी माता मंदिर विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी मिळणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची सरकारकडून ग्वाहीछत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर येथे भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करावा, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असे आश्वासन पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (१५ सप्‍टेंबर) दिले. हरसिद्धी माता मंदिरात महाप्रसाद […]

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची सरकारकडून ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर येथे भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करावा, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असे आश्वासन पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (१५ सप्‍टेंबर) दिले.

हरसिद्धी माता मंदिरात महाप्रसाद कार्यक्रमास पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. मंत्री सत्तार यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंदिर परिसराची पाहणी केली. उपस्थित महिलांशी लाडकी बहीण योजनेबाबत संवाद साधला. येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे, शिरीष बोराळकर, श्रीराम पाटील महाजन, किशोर बलांडे, विजय औताडे, पुनमचंद बमणे, अनिस पटेल, हरिदास हरणे, संजय हरणे, नारायण सुरे, रावसाहेब औताडे, भिमलाल हरणे आदींसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व भाविकांची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software