विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू; छत्रपती संभाजीनगरात नोडल अधिकाऱ्यांना दिले प्रशिक्षण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, ७ ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. निवडणुकीचे कामकाज करताना सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. नियोजन सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल लांजेवार, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, ७ ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. निवडणुकीचे कामकाज करताना सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

नियोजन सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल लांजेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणात मतदान यंत्रांची तपासणी, मतदान केंद्रावरील व्यवस्था, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार जनजागृती (स्वीप), मतदान प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था, मीडिया कक्ष अशा विविध विषयांवर सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणुकीच्या कामकाजात पूर्णतः निष्पक्षता व पारदर्शकता बाळगणे आवश्यक असते. त्यासाठी नियमांची परिपूर्ण माहिती व अभ्यास असणे आवश्यक आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी नियमांचा अभ्यास करावा व आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करावे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. मतदार जनजागृती करून नैतिक मतदानाचे महत्त्व मतदारांना पटवून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software