- Marathi News
- सिटी डायरी
- प्रशासनाकडून जिल्ह्याची अंतिम मतदान आकडेवारी जाहीर; वाचा कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान आणि आता...
प्रशासनाकडून जिल्ह्याची अंतिम मतदान आकडेवारी जाहीर; वाचा कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान आणि आता मतमोजणीची कशी आहे तयारी…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत मिळून एकूण ६९.६४ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २१ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते. मतदान प्रक्रिया […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत मिळून एकूण ६९.६४ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २१ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिली.
सिल्लोड-८०.०८ टक्के, कन्नड-६९.३१ टक्के, फुलंब्री-७२.२२ टक्के, औरंगाबाद मध्य-५९.३५ टक्के, औरंगाबाद पश्चिम-६०.५८ टक्के, औरंगाबाद पूर्व-६०.६३ टक्के, पैठण-७७.५३ टक्के, गंगापूर-७३.७७ टक्के, वैजापूर-७५,९४ टक्के. असे एकूण सरासरी ६९.६४ टक्के मतदान झाले होते.
विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, पुरुष व इतर वर्गनिहाय मतदान
सिल्लोड-पुरुष-१,५०,५८५,महिला-१,३६०९५,इतर-२, एकूण मतदान- २,८६,६८२.
कन्नड-पुरुष-१,२२,५१९,महिला-१,०८,०९९,इतर-४,एकूण मतदान- २,३०,६२२
फुलंब्री-पुरुष-१,४१,५२८,महिला-१,२६,१७६,इतर-२,एकूण मतदान- २,६७,७०६.
औरंगाबाद मध्य-पुरुष-१,१४,९८३,महिला-१,०३,९७८,इतर-५,एकूण मतदान- २,१८,९६६.
औरंगाबाद पश्चिम-पुरुष-१,३०,०१७,महिला-१,१६,६०६,इतर-१५,एकूण मतदान- २,४६,६३८.
औरंगाबाद पूर्व-पुरुष-१,१४,१०४,महिला-१,००,९२१,इतर-४,एकूण मतदान- २,१५,०२९.
पैठण-पुरुष-१,३३,९६४,महिला-१,१८,२७३,इतर-०,एकूण मतदान- २,५२,२३७.
गंगापूर-पुरुष-१,४१,७३०,महिला-१,२७,३३७,इतर-८,एकूण मतदान- २,६९,०७५.
वैजापूर-पुरुष-१,२९,१८७,महिला-१,१४,१९२,इतर-०,एकूण मतदान- २,४३,३७९.
मतदान केंद्रावरील आरोग्य सेवेचा ९४७९ जणांना लाभ
प्रत्येक मतदान केंद्रस्थळी आरोग्य सेवांसाठी आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या सेवांचा लाभ ८३२४ मतदारांनी घेतला तर ११५५ मतदान कर्मचाऱ्यांनी अशा एकूण ९४७९ जणांनी लाभ घेतला. दरम्यान, मतदान प्रक्रियेत ३४ कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी ८ जणांना खाजगी रुग्णालयात तर २६ जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मतमोजणीसाठी सज्जता
शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची सज्जता झाली आहे. आजच मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण करण्यात आले. इव्हीएमसाठी १२६ टेबल असतील. टपली मतपत्रिकांसाठी ७० टेबल असतील तर ईटीपीबीएससाठी १२ टेबल असतील, अशी माहिती देण्यात आली. ८५२ मतमोजणी कर्मचारी, २४२ सूक्ष्म निरीक्षक व ३००० पोलीस कर्मचारी असे ५७७८ मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्या अशा…
सिल्लोड-२९, कन्नड-२७, फुलंब्री-२७, औरंगाबाद मध्य-२३, औरंगाबाद पश्चिम -२८, औरंगाबाद पूर्व-२४, पैठण-२६, गंगापूर-२७, वैजापूर-२६. मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटीव्हीद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ केंद्रीय बल गट तर २ राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.