छ. संभाजीनगरात उद्यापासून ‘तरंग’ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा; ४० कंपन्या होणार सहभागी; विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंग : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ २७ ते २९ जुलैदरम्यान आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक समन्वयक मंगेश केदार यांनी दिली आहे. मराठवाड्यातील चाळीस शेतकरी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंग : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ २७ ते २९ जुलैदरम्यान आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक समन्वयक मंगेश केदार यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. हा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील पाटीदार भवन, अमरप्रीत हॉटेल समोर, जालना रोड येथे होणार आहे. मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. नाबार्डमार्फत देशातील ५० शहरांमध्ये हा उपक्रम होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापक रशी दराड, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घरड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, नाबार्डचे उप प्रबंधक अनिल रावत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याच्या समारोपास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात जिल्हा अग्रणी बँक समन्वयक मंगेश केदार, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमोल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड तसेच निधी पंत, मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे संचालक प्रसाद कोकील, श्रीमती रुचा गणोरकर आदी मान्यवर विविध सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यात सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. यात कृषी उत्पादने, फळे, भाजीपाला, धान्ये, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि इतर विविध वस्तूंचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करावी असे, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software