- Marathi News
- सिटी डायरी
- छ. संभाजीनगरमध्ये अडीचशेच्यावर पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट!; कॅरिऑन किंव...
छ. संभाजीनगरमध्ये अडीचशेच्यावर पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट!; कॅरिऑन किंवा ‘ओटीओ’साठी साकडे
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील पॉलिटेक्निकच्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट आले आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे हे विद्यार्थी असून, त्यांना अमानवीय वागणूक देण्यात आल्यानंतर आता चक्क कॅरिऑन किंवा वन टाइम ॲपोच्युर्निटी (ओटीओ) देण्यास नकार दिला जात असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. अवघ्या ४ महिन्यांसाठी त्यांचे २ वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. याबाबत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील पॉलिटेक्निकच्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट आले आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे हे विद्यार्थी असून, त्यांना अमानवीय वागणूक देण्यात आल्यानंतर आता चक्क कॅरिऑन किंवा वन टाइम ॲपोच्युर्निटी (ओटीओ) देण्यास नकार दिला जात असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. अवघ्या ४ महिन्यांसाठी त्यांचे २ वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना साकडे घातले आहे. शिक्षण मंत्र्यांनाही ई-मेल केला आहे. मात्र अद्याप उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील या विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ई-मेल केले, कॉलही केले. मात्र अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्या ई-मेलची अद्याप दखलही घेतली गेलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. एरवी कायम विद्यार्थी हितासाठी पुढे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांची अवस्था लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे. यातून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 15:34:08
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : झोक्यावरून पडून आपेगाव (ता. पैठण) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै)...