- News
- सिटी डायरी
- गुंठेवारीतील बांधकामे अधिकृत करण्यासाठी आता ३१ डिसेंबरची मुदत!; महापालिकेचा निर्णय
गुंठेवारीतील बांधकामे अधिकृत करण्यासाठी आता ३१ डिसेंबरची मुदत!; महापालिकेचा निर्णय
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील गुंठेवारी वसाहतींमधील २०२० पर्यंतची बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यावर महापालिकेकडून अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेने बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती. ती आता वाढून ३१ डिसेंबर २०२४ केल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली. ११९ गुंठेवारी वसाहतींमधील […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील गुंठेवारी वसाहतींमधील २०२० पर्यंतची बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यावर महापालिकेकडून अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेने बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती. ती आता वाढून ३१ डिसेंबर २०२४ केल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेने यंदा मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ५०० कोटींचे ठेवले असून, वसुली वाढविण्यासाठी टॅक्समित्र या नावाने नवीन वॉररूम महापालिकेत तयार केली आहे. पुढील १० दिवसांत या वॉररूममधून कामकाज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत यांनी दिली. महापालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या टप्पा क्रमांक तीनमधील दुसऱ्या मजल्यावर ही वॉररूम तयार केली आहे. वॉर्ड अधिकारी प्रसाद देशपांडे हे या उपक्रमाचे प्रमुख असून उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

