अर्धा पावसाळा उलटून गेला, जायकवाडीत अवघे ४ टक्‍केच पाणी..!, आज सकाळची आकडेवारी पाटबंधारे विभागाकडून जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस होत नसल्याने अर्धा पावसाळा उलटून गेला तरी आज, २३ जुलैला धरणात केवळ ४.१३ टक्‍केच पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी याच तारखेला तब्‍बल २७ टक्‍के पाणीसाठा होता. त्‍यातुलनेत यंदा मराठवाड्यासमोर मोठेच जलसंकट उभे राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. जायकवाडीच्या वरची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस होत नसल्याने अर्धा पावसाळा उलटून गेला तरी आज, २३ जुलैला धरणात केवळ ४.१३ टक्‍केच पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी याच तारखेला तब्‍बल २७ टक्‍के पाणीसाठा होता. त्‍यातुलनेत यंदा मराठवाड्यासमोर मोठेच जलसंकट उभे राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

जायकवाडीच्या वरची धरणेही अद्याप भरलेली नाहीत. त्‍यामुळे त्‍या धरणांतून पाणी सोडण्याची शक्‍यता नाहीच. त्‍यातच पाणलाेट क्षेत्रात पुरेसा पाऊस होत नसल्याने धरणात दाखल होणारे पाणी नगण्य आहे. सध्या धरणात २२२ क्‍युकेसने पाण्याची आवक होत आहे. १ जून २०२४ पासून धरणात १.९९ टीएमसी पाणी दाखल झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरणातून अद्याप एकदाही विसर्ग करण्यात आलेला नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software