- News
- सिटी क्राईम
- विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वा...
विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी जाताना दिसले, की लुटमार करतात. ३ डिसेंबरच्या घटनेनंतर बुधवारीही (१० डिसेंबर) २५ वर्षीय तरुणाला तिघांनी लुटले. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. हा रस्ता रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत असून, वारंवार लुटमारीच्या घटना घडत असूनही पोलीस त्यावर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत.
३ डिसेंबरला पहाटेही विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे एनसीसी सरावासाठी जाणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला ३ टवाळखोरांनी अडवून शिवीगाळ, दमदाटी करत कटरने वार केले होते. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आता अक्षयसोबत ही घटना घडली. या रस्त्यावर सातत्याने टवाळखोर आणि लुटारूंचा वावर असून, रात्रीच्या वेळी ते एकट्यादुकट्या व्यक्तीला गाठून लुटमार, मारहाण करत असतात. या रस्त्यावर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी वारंवार होऊनही पोलीस गांभीर्याने घेत नसल्याने मोठा अनुचित प्रकारही घडू शकतो.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
02 Mar 2026 19:45:00
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...

