एअर इंडियाच्या अधिकाऱ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं, चिकलठाण्यातील SBI च्या ATM मध्ये भामट्याने अशी केली दिशाभूल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एअर इंडियाच्या अधिकारीही एका भामट्याच्या जाळ्यात अडकला. मशीनमध्ये कार्ड फसल्यानंतर भामट्याने त्यांना वॉचमनला बोलवायला पाठवून कार्ड घेऊन गायब झाला. नंतर या कार्डच्या मदतीने ४३ हजार रुपये काढून घेतले. ही घटना सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

संजय भाऊसाहेब जाधव (वय ४२, रा. गोलोकधाम हौसिंग सोसायटी, इस्कॉन मंदिराजवळ, वरुड फाटा, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते एअर इंडिया कंपनीत सिनीअर ऑफिसर आहेत. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाण्यातील आंबेडकर चौकातील एसबीआय एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. तिथे आधीच एक अनोळखी व्यक्ती पैसे काढत होता. जाधव यांनी एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकून १ हजार रुपये काढले. पैसे काढल्यानंतर जाधव यांचे एटीएम कार्ड मशीनमध्येच फसले.

त्यामुळे जाधव यांनी १० मिनीटे कार्ड मशिनमधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निघाले नाही. तेव्हा तो बाजूचा व्यक्ती म्हणाला, की "तुम्ही मुकुंदवाडी सिग्नलवर एक एटीएम आहे, तेथे जो वॉचमन आहे. तो तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड मशिनमधून काढून देईल. तुम्ही त्याला घेऊन या.’ असे सांगितले. त्यामुळे जाधव हे त्या वॉचमनकडे निघाले. तेवढ्यात त्यांना थेट बँकेतून कॉल आला व त्यांनी तुमच्या बँकेतून पैसे ट्रान्सफर होत आहेत. जाधव भांबावले.

ते परत एटीएमकडे धावले. तिथे त्यांचे एटीएम कार्ड दिसले नाही, की तो व्यक्तीही दिसला नाही. त्यांनी लगेचच शेंद्रा येथील SBI बँकेत धाव घेऊन खात्याचे स्टेटमेंट काढले. त्यात त्यांना कळले, की त्यांच्या एटीएम कार्डवरून ४३ हजार रुपयांचे ट्रान्जेक्शन झाले आहे. त्यामुळे एसबीआय एटीएममध्ये त्या अनोळखी व्यक्तीनेच गंडा घातल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार रणजितसिंग चव्हाण करत आहेत.

भामट्याची नवी शक्कल...
ज्या पद्धतीने एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले आणि जाधव हे वॉचमनला बोलवायला जाताच भामट्याने ते काढून घेतले, यावरून ती ट्रिक भामट्याचीच असावी. त्यानेच काहीतरी मशीनमध्ये घोळ केला, जेणेकरून एटीएम अडकावे. त्यानंतर त्याला ते काढायचे कसेही हेही माहीत होते. त्याने लगेचच ते एटीएम घेऊन पलायन केले. त्यामुळे जोपर्यंत हा भामटा पकडला जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीने अनेकांना गंडवू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software