टीव्ही सेंटर परिसरातील थरार...२४ वर्षांचा गुंड हातात कोयता घेऊन धावत सुटला...पुढे काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थळ : टीव्ही सेंटर परिसर, वेळ सायंकाळची साडेसहाची... एक २४ वर्षांचा गुंड हातात धारदार कोयता, शर्टात पाठीला लावलेला चाकू... अत्यंत रागाने रस्त्याने धावत सुटला... काही क्षण नागरिकांचा थरकाप उडाला... व्यापारी भ्याले... खळबळ उडाली. गणेश सुभाष सोनवणे (वय २४, रा. मिसारवाडी) असे या गुंडाचे नाव असल्याचे नंतर समोर आले. मंगळवारी (२३ सप्‍टेंबर) हा प्रकार घडला.

गणेश टीव्ही सेंटर परिसरात आल्यानंतर हातात कोयता धरून शिवीगाळ करू लागला. टीव्ही सेंटरमार्गे तो एम-२ परिसर, आंबेडकरनगरमार्गे पिसादेवीकडे गेला. नागरिकांनी ही माहिती तोपर्यंत सिडको पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी त्‍याचा पाठलाग सुरू केला. पिसादेवीच्या रस्‍त्‍यावर त्‍याच्यावर झडप घातली. पोलीस त्‍याला पकडत असताना त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पोलीस ठाण्यात नेत त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत यथेच्छ पाहुणचारही केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software