वाळूज MIDC,  सिटी चौक पोलिसांनी अटक केले २ चाकूधारी!; दहशत माजवत होते, पोलिसांनी मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबले!! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन गुंडांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. सिटी चौक पोलिसांनी चेलीपुरा चौकात तर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वडगाव कोल्हाटीत गुन्हगाराच्या मुसक्या आवळल्या. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव करण मारोती गायकवाड (वय २४, शांताई शाळेच्या बाजूला शिवाजीनगर वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर) आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना गोपनीय माहिती मिळाली, की करण हातात तलवार व सुरा घेऊन दहशत माजवत आहे. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना आदेश देऊन कारवाईसाठी पाठवले. पथकाने वडगाव कोल्हाटीत करणला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे धारदार तलवार व सुरा मिळून आला. ही कारवाई पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, पोलीस अंमलदार सुरेश कचे, राजाराम वाघ, दीपक जाधव, सुरेश भिसे, जयेश साळुंके, शिवनारायण नागरे यांनी केली.

सिटी चौक पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव जफर जुम्मा पठाण (वय ३२, रा. चाऊस कॉलनी काचीवाडा छत्रपती संभाजीनगर) असे आहे. सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेसहाला सिटी चौक पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली, की चेलीपुरा चौकाजवळील महावीर घरसंसार दुकानासमोर येथे एक युवक हातात चाकू घेऊन उभा असून तो परिसरात दहशत निर्माण करत आहे. पोलिसांनी लगेचच तिथे धाव घेतली. पोलिसांना पाहून चाकूधारी युवक शहागंज ते हिंदीभवनकडे पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून एसबीआय बँकेसमोर पकडले. त्याने त्याचे नाव जफर जुम्मा पठाण असे सांगितले. त्याच्याकडे स्टिलचा ५ इंच मूठ असलेला व ८ इंच पाते असलेला धारदार चाकू मिळून आला. हा चाकू पोलिसांनी जप्त केला. त्‍याच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्याचे अंमलदार पुरुषोत्तम जाधव यांनी तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार नागोराव घुगे करत आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software