सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर इतर किरकोळ जखमी झाले. लाठ्याकाठ्या, धारदार शस्त्रांसह दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले होते. दोघांवर सह्याद्री, तर एकावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (६ डिसेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. रविवारी पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सहायक फौजदार संजय हंबीर यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी (६ डिसेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास सुरेवाडी गल्ली नं. ४ च्या समोरील रोडवर ८ ते १० व्यक्तींमध्ये लाठ्या काठ्या व धारदार शस्त्रासह हाणामारी सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  सहायक फौजदार संजय हंबीर आणि प्रकाश दिवटे यांनी सहकाऱ्यांसह लगेचच घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांची गाडी पाहून भांडणारे पळून गेले. हाणामारीतील जखमी सुरेश राधाकिशन सुरे हा एम्स हॉस्पिटलमध्ये आणि कृष्णा एकनाथ ब्रह्म, रमेश गुंजाळ हे दोघे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन माहिती घेतली. सुरेश जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर कृष्णाने पोलिसांना सुरेवाडीत सुरेश सुरे व त्याच्या साथीदारांसोबत हाणामारी झाल्याचे सांगितले.

मात्र त्याने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीच स्वतःहून पुढे येत एका गटातील सुरेश राधाकिशन सुरे (वय ३०), किरण खेमचंद पचलोरे (वय २१), रुपेश भागिरथ सुरे (वय २३), शिवा आंबादास सुरे (वय २३), मनिष गंगाधर ब्राह्मणे (वय २०), ऋषिकेश विजय हाडुळे (वय २२, सर्व रा. सुरेवाडी, छत्रपती संभाजीनगर) व दुसऱ्या गटातील कृष्णा एकनाथ ब्रह्मे, दीपक ब्रह्मे, सागर पांढरे, मनोज हारणे, रमेश खेमचंद गुंजाळ (वय २३, रा. जमनज्योती हर्सूल) अशा एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी लाठ्या काठ्या व धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हाणामारी केली. यात सुरेशला धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी केले असून, कृष्णाचा पाय दगड मारून फ्रॅक्चर केला आहे, तर रमेशच्या डोक्यात काहीतरी शस्त्राने मारून जखमी केले आहे. इतरही किरकोळ जखमी आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सदाफुले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software