बीड बायपास भागात महिलेसोबत घडली होती ती घटना, अखेर अट्टल गुन्हेगार जेरबंद करण्यात यश, छत्रपती संभाजीनगरच नव्हे पुण्यातही कुख्यात, १४ गंभीर गुन्हे केल्याचे आले समोर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बीड बायपास भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला धक्का देऊन पाडत ८० हजारांचे दागिने लुटून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करण्यात शनिवारी (८ नोव्हेंबर) यश मिळवले. त्याच्याविरुद्ध १४ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२४ जानेवारी २०२५ रोजी विजया जगन्नाथ जैवाळ (वय ४६, रा. हरिरामनगर, नंदिनी हॉटेलमागे बीड बायपास) या घराजवळ मॉर्निंग वॉक करत होत्या. सकाळी पावणेसातच्या सुमारास मागून देवळाई चौकाकडून एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलीवर तोंड बांधून आलेल्या तिघांनी त्यांना जोरात धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांची ५० हजारांची सोन्याची चैन व ३२ हजारांची सोन्याची अंगठी हिसकावून घेऊन सुसाट निघून गेले. बाळापूर शिवारातील स्वस्तिक टाइल्स दुकानासमोर ही घटना घडली होती.

या प्रकरणात विजयाबाई यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांनी ३ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला होता. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा कुलदीप अर्जुन पवार (रा. राहेरा ता. घनसावंगी जि. जालना) याने केला असून तो अंबड येथे येणार आहे. त्यानंतर राजपूत यांनी तत्काळ आपल्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने अंबडला जाऊन त्याचा मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो मिळून आला. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो अट्टल गुन्हेगार निघाला. त्याने चिकलठाणा, पाचोड, बिडकीन तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीत सातारा, जालन्यातील गोंदी, पुण्यातील दिघी, पिंपरी चिंचवड, आळंदी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १४ गुन्हे केल्याचे समोर आले.

मुद्देमालासह त्याला चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, वाल्मीक निकम, दत्ता मुंडे, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, महिला अंमलदार सरला जाधव, कविता पवार व चालक संजय तांदळे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software