उस्मानपुऱ्यात आढळलेल्या अर्भकप्रकरणी महिनाभराने गुन्हा दाखल, चेंबरमध्ये आढळले होते स्‍त्री जातीचे मृत बाळ

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगरात क्रूर मातेच्या प्रतापाने अवघे शहर चिंताग्रस्त झाले असतानाच, उस्मानपुऱ्यात महिनाभरापूर्वी आढळलेल्या अर्भकप्रकरणी शनिवारी (३० ऑगस्ट) उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कबीरनगरात हापसी गल्लीतील दोन चेंबर गेल्या ३० जुलैला चोकअप झाले होते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कंत्राटी सफाई कामगार बादल रतन हिवाळे (वय ३३, रा. छोटा मुरलीधरनगर) आणि घनश्याम धर्मा रोकडे हे चोकअप काढण्यासाठी आले. एका चेंबरचे झाकण उघडताच त्‍यांना स्‍त्री जातीचे मृत अर्भक आढळले. त्यांनी लगेचच उस्मानपुरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात पाठविले. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता. बादल हिवाळे आजारी असल्याने तक्रार देण्यासाठी आले नसल्याचे सांगण्यात आले. अखेर शनिवारी त्‍यांच्या तक्रारीवरून क्रूर मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक हेमंत सुपेकर त्‍या क्रूरमातेचा शोध घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पपईच नाही तर त्याच्या पानांमध्येही आरोग्याचा खजिना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software