रांजणगाव शेणपुंजीतील साहिल ऑटो कंपनीसमोरील खुनाचा संशयित जालन्यातून आणला पकडून!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील साहिल ऑटो टेक्नॉलॉजी कंपनीसमोर दोन कामगारांत भांडण होऊन एकाने दुसऱ्याचा खून केला होता. शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. खुनानंतर संशयित कामगार फरारी झाला. त्याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या मूळगावी जामवाडी (ता. जि. जालना) जाऊन पकडून आणले.

लक्ष्मण ज्ञानेश्वर वाढेकर (वय २४, रा. जामवाडी) असे संशयिताचे नाव असून, चंद्रमुनी साहेबराव कांबळे (वय ३३, रा. शिवनेरी कॉलनी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चंद्रमुनीचा भाऊ अमोल (वय ३३, मूळ रा. वडचुना, पो. आडूळ, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, ह. मु. कृष्णानगर, हनुमान मंदिरासमोर, रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर) याने तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी शनिवारी लक्ष्मणविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सहायक पोलीस आयुक्त भागीरथी पवार यांनी लक्ष्मणला शोधून आणण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार केले. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, सुरेश कचे, सुरेश भिसे, नितीन इनामे, राजाराम वाघ, रोहित चिंधळे यांनी लक्ष्मणचा शोध सुरू केला. तो मूळ गावी पळून गेल्याचे कळताच पथकाने त्याच्या मूळगावी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

अशी घडली होती घटना...
चंद्रमुनीचा सख्खा भाऊ अमोल हा लक्ष्मी अग्नी कंपनीत हेल्पर आहे. अमोलने दिलेल्या तक्रारीनुसार, चंद्रमुनी हा दोन वर्षांपासून रांजणगाव शेणपुंजीच्या साहिल ऑटो टेक्नॉलॉजी कंपनीत चालक होता. तो शिवनेरी कॉलनीत एकटाच भाड्याने राहत होता. शुक्रवारी चंद्रमुनीने कंपनीत दिवसभर ड्युटी केली. रात्री साडेआठला त्याच्या मोटारसायकलीवरून एकटाच अमोलकडे आला होता. सोबत त्याने खाण्यासाठी पाव आणलेले होते. ते पाव अमोलकडे देऊन तो बाजूलाच राहत असलेल्या अमोल गजानन खाडे, दीपक गुलाब लहाने आणि साहिल ऑटो कंपनीतच गेल्या सहा महिन्यांपासून रोजंदारी करत असलेल्या लक्ष्मण वाढेकर यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत बोलत बसला.

काही वेळाने ते चौघेजण चंद्रमुनीच्या मोटारसायकलवर बसून तेथून निघून गेले. चौघे यूपी ढाबा येथे गेले. तिथे थोडा वेळ थांबून साहिल ऑटो कंपनीसमोर रात्री पावणेदहाच्या सुमारास आले. तिथे चंद्रमुनी व लक्ष्मण वाढेकर यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले. अमोल खाडे व दीपक लहाने यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. मात्र लक्ष्मण वाढेकर कोणाचेही न ऐकता चंद्रमुनीसोबत हुज्जत घालत होता. त्याला लोटालोटी करत होता. त्याने ढकलून दिल्याने चंद्रमुनी कंपनीसमोरील पार्किंग शेडमधील लोखंडी प्लेटवर पडला. त्या प्लेटचा कोना चंद्रमुनी याच्या डोक्याला लागल्याने चंद्रमुनीच्या डोक्याला गंभीर जखम होऊन तो तेथेच बेशुद्ध पडला.

हा प्रकार पाहून कंपनीतील कॅज्युअलमधील रवींद्र भगवान हिवाळे व तेथील वॉचमन बापुराव शिंदे तसेच अजून काही कंपनीतील कामगार धावून आले. त्यावेळी लक्ष्मण वाढेकर तिथून पळून गेला. चंद्रमुनी बेशुद्ध पडल्याने एचआर शिवशंकर सविता, कंपनीतील कामगार रवींद्र हिवाळे, कैलास बोबडे व अभिषेक जाधव अशांनी मिळून चंद्रमुनीला कंपनीचे वाहनातून आधी बजाजनगर येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल, नंतर घाटी रुग्णालयात हलवले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून चंद्रमुनी याला मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software