आश्चर्यम्‌... मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये कार नदीत कोसळली... कारमध्ये होता भाजप नेतापूत्र… १० दिवस यंत्रणा शोधत होती, तो सोयगावच्या फर्दापुरात आढळला...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी (५ सप्‍टेंबर) सकाळी सुसाट कार कठडे नसलेल्या पुलावरून नदीत कोसळली. भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी कार चालवत होता. तो इंदूरला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु पुलावर त्याचे नियंत्रण सुटले आणि कार थेट कालीसिंध नदीत पडली. पोलीस आणि आपात्‍कालिन यंत्रणा विशालचा नदीत शोध घेत होती. पण आश्चर्यकारक घटना अशी घडली, की विशाल चक्क छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळून आला आहे. तो सोयगाव तालुक्‍यातील फर्दापूर पोलीस ठाण्यात कसा आला, याचे कुतूहल निर्माण झाले आहे.

mp-raj-06-rajgarhnews_0509202511 (1)
नदीतून कार बाहेर काढण्यात आली. पण त्‍यात विशाल सोनी नव्हते.

 

विशाल यांचा शोध सुरू असताना त्‍यांचा मोबाइल सुरू असल्याने यंत्रणेला ते जीवंत असल्याची आशा निर्माण झाली. लोकेशन आधी इंदूर, नंतर महाराष्ट्र आढळले. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद झाला होता. महाराष्ट्रात लोकेशन आढळल्याने पोलिसांनी मग ते जीवंत असल्याच्या दृष्टीने शोधकार्य गतिमान केले. आज, १५ सप्‍टेंबरला विशाल चक्क फर्दापूरमध्ये अवतरला. त्यानंतर फर्दापूर पोलिसांनी लगेचच सारंगपूर पोलिसांना कळवले. सारंगपूर पोलिसांचे पथक त्याला घेण्यासाठी येत असून, रात्री १० पर्यंत ते शेगावला आले होते. विशाल धुळीने माखलेल्या कपड्यांमध्ये आणि थकलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. कार नदीत पडल्यावर तो कसा वाचला, कारबाहेर आला आणि १० दिवस कसा भटकून थेट सोयगावच्या फर्दापूरमध्ये अवतरला... हे रहस्य आता विशालच्या चौकशीनंतरच समोर येणार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software