विद्यापीठाच्या होस्टेलमधील धक्कादायक प्रकार : ३ ते ४ टवाळखोरांनी होस्‍टेलमध्ये विद्यार्थ्याला बॅटने केली अमानुष मारहाण!; सर्व विद्यार्थी दहशतखाली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि‌द्यापीठाच्या होस्टेलमध्ये सध्या टवाळखोरांचा सर्रास वावर असतो. ते धिंगाणा घालून विद्यार्थ्यांना वेठीस धरतात. सोमवारी (१७ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी हद्दच केली. गोंधळ घालू नका, असे सांगायला विद्यार्थ्याला त्यांनी बॅटने अमानुष मारहाण केली. बेगमपुरा पोलिसांनी ३ ते ४ अनोळखी टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आदर्श अजिनाथ गिते (वय २२, रा. वंजारवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि‌द्यापीठात एमएम प्रथम वर्षात शिकत आहे. तो विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज होस्टेलमध्ये राहतो. सोमवारी (१७ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास तो रूममध्ये झोपलेला होता. रूम बाहेरून गोंधळ व आरडाओरडा करण्याचा आवाज येत असल्याने आदर्श व त्याचा मित्र नारायण उठले. दरवाजा उघडला. बाहेर मुलांचा घोळका दिसल्याने आदर्शने त्यांना शांत बसा. आम्हाला डिस्टर्ब होत आहे, असे म्हटले.

त्यामुळे संतापलेल्या दोघा- तिघांनी आदर्श व नारायणला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यातील तीन ते चार जणांनी दोघांना हाताचापटाने मारहाण सुरू केली. त्यामुळे आदर्श होस्टेलमध्ये पळू लागला. तेव्हा त्यातील एक मुलगा बॅट घेऊन त्याच्या मागे लागला. आदर्शला पकडून बॅटने बेदम मारहाण केली. त्यानंतर टवाळखोर निघून गेले. त्यानंतर आदर्श व त्याचे होस्टेलचे मित्र बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पोलिसांनी ३ ते ४ अनोळखी टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गोरखनाथ पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software