- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC त सुसाट मद्यधुंद ट्रकचालकाचा थरार, आधी ट्रकला उडवले, नंतर रस्त्यालगतच्या ४ दुचाकींना उडवल...
वाळूज MIDC त सुसाट मद्यधुंद ट्रकचालकाचा थरार, आधी ट्रकला उडवले, नंतर रस्त्यालगतच्या ४ दुचाकींना उडवले!; सुदैवाने जिवीत हानी नाही...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मद्यधुंद ट्रकचालकाने शनिवारी (२३ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत थरार घडवला. सुसाट ट्रक चालवत आधी समोरून येणाऱ्या ट्रकला उडवले, नंतर तिथेच रस्त्यालगत उभ्या केलेल्या ४ दुचाकींना उडवले. यात दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाल्या आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
एमएच २० जीसी ५१४४ क्रमांकाचा ट्रक रांजणगाव शेणपुंजी फाट्याकडून ई-सेक्टरच्या दिशेने सुसाट आला. एंडुरन्स कंपनीसमोर समोरून येणाऱ्या एमएच २० जीसी ९१८० क्रमांकाच्या ट्रकला तो धडकला. नंतर कामगारांच्या रस्त्यालगत उभ्या केलेल्या मोटारसायकलींना उडवत गेला. यात रतन सुखदेव साळवे, रवी मच्छिंद्र पवार, गौरव संजय आसाबे, सतीश शिंदे यांच्या दुचाकींचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
विशेष म्हणजे, ज्या चारही दुचाकींचे नुकसान झाले, त्या रस्त्यालगत पार्क केलेल्या होत्या. कंपनीने कामगारांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे असताना कामगारांना त्यांच्या दुचाकी अशा रस्त्यालगत लावाव्या लागत होत्या. परिणामी ट्रकने चार दुचाकी उडवून कामगारांचे मोठे नुकसान केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
By City News Desk
Latest News
06 Mar 2026 21:18:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...

