गंगापूरमधील युवकाच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; वर्चस्ववादातून दोन मित्रांनीच गावठी कट्ट्यातून घातल्या राहुल नवथरला गोळ्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्‍हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३५ वर्षीय युवकाची गोळी घालून हत्‍या करण्यात आल्याची खळबळजनक घटना भिवधानोरा (ता. गंगापूर) शिवारात मंगळवारी (१६ सप्‍टेंबर) सायंकाळी ५.३० च्या सुमारास समोर आली होती. त्‍याच्या खुनाचा उलगडा गंगापूर पोलिसांनी युद्धपातळीवर केला आहे. ३ मित्रांनी सोबत दारू पिल्यानंतर तिसऱ्याचा वर्चस्ववादातून खून केल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी संशयित दोघांपैकी एकाला अटक केली असून, दुसरा फरारी आहे. त्‍याचा शोध घेतला जात आहे.

राहुल रमेश नवथर (वय ३५, रा. गळनिंब, ता. गंगापूर) असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे. योगेश कल्याण नागे ( वय २७) व कानिफनाथ मावस (वय ४५, दोघे रा. भिवधानोरा) अशी संशयितांची नावे आहेत. सोमवारी दुपारी राहुल, कानिफनाथ आणि योगेश हे ३ मित्र भिवधानोरा शिवारातील शेतात दारू पित बसले होते. नशेत असतानाच दोघांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यात तर तिसरी पोटात लागली.

राहुलचा जागीच मृत्‍यू झाला. त्‍यानंतर योगेश व कानिफनाथ पसार झाले. भिवधानोरा येथील शेतकरी नारायण चव्हाण शेतात जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला राहुलचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील शिवाजी तांगडे यांना कळवले. तांगडे यांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के, गोपनीय शाखेचे मनोज नवले, पोलीस अंमलदार मनोज घोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस खून कुणी व का केला, याचा तपास करत असतानाच पोलीस अंमलदार संदीप राठोड यांना गोपनीय बातमीदाराने माहिती मिळाली, की संशयित योगेश पुण्याकडे पळून जात आहे. सध्या नेवासा फाटा येथे थांबला आहे. संदीप राठोड, विजय नागरे व अनिरुद्ध शिदे यांनी आज, १७ सप्‍टेंबरच्या पहाटे अडीचला शिताफीने सापळा रचून नागेला जेरबंद केले. कानिफनाथ मोबाइल बंद करून फरारी आहे. राहुल तीन वर्षे आधी मुंबईत महावितरणमध्ये वायरमन होता. नोकरी सोडून गावात आला होता. राहुल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software