प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा मंगळवारी (१७ मार्च) झाला आहे. मुख्य मारेकरी विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा) याच्या रीलस्टार मैत्रिणीला शहर गुन्हे शाखेने चौकशीला बोलावले होते. या तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांचे बाँडवर करारनामेही झाले. तरुणीने पैसे तर घेतले पण परत केल्याच्या नोंदी नाहीत. ही तरुणी २०२१ मध्ये बिडकीनमध्ये झालेल्या करोडोंच्या घोटाळ्यातील सूत्रधाराच्याही संपर्कात होती, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. ती सोशल मीडियावर व्हिडीओ बनवते. मुंबईत अनेक सिनेमे, अल्बम केल्याचे दावे सोशल मीडियावर आहेत.

लोंढे आणि तरुणीमध्ये तसेच लोंढे व विशालमध्ये झालेल्या व्यवहारांचे करारनामे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. २०२३ मध्ये लोंढे यांची विशालसोबत ओळख झाली होती. सारख्या सवयींमुळे काही दिवसांतच त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. सिनेमा काढण्याच्या नावाखाली विशालने वर्षभरापूर्वी लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले होते, ते परत केले नसताना लोंढे यांनी पुन्हा डिसेंबर २०२५ मध्ये त्याला ५० लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले. आधीचेच पैसे मिळाले नसताना लोंढे यांनी पुन्हा विशालला पैसे दिल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

ब्लॅकमेलिंगचा प्रकार असेल तर मग करारनामे कसे झाले, पैसे परत करण्यावरून वाद होत असतील तर मग लोंढे, विशाल सातत्याने का भेटत होते, पार्ट्यांना सोबत कसे जात होते, विशालच्या मैत्रिणीलाही लाखो रुपये का दिले, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. आतापर्यंत आर्थिक वादासह लोंढे यांनी विशालच्या वैयक्तिक आयुष्यातील महिलेबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य खुनामागे दिसत होते. मात्र, तपासात जे धक्कादायक खुलासे होत आहेत, त्यावरून हे प्रकरण दिसते तितके सोपे नक्कीच नाही, यामागे नक्कीच काहीतरी मोठे दडले आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विशालला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
प्रा. लोंढे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी ॲट्रॉसिटी कलमही वाढवले आहे. अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक असल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक राजपूत यांच्याकडे तपास सोपवला आहे. मंगळवारी (१७ मार्च) मुख्य मारेकरी रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४) व त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांच्यासमोर विशाल व आकाशने पोलिसांवर आरोप केले.

मारहाण करून कुटुंबाला धमकावल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांची खासगीत प्रश्न करून प्राथमिक चौकशी केली. आकाशच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. तपासणीत आकाशच्या शरीरावर जखमा आढळल्याचे न्यायालयासमोर आल्यावर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली, तर विशालच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ केली. सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी शासनातर्फे बाजू मांडली. 

हे प्रश्न अनुत्तरीत...
-खून केल्यानंतर प्रा. लोंढे यांचा मोबाइल विशालने घेतला होता, तो मोबाइल कुठे आहे? तो मोबाइल पोलिसांकडे आल्यास अनेक खुलासे होऊ शकतात.
-लोंढे यांच्याकडून उकळलेल्या १ कोटी रुपयांचे विशालने काय केले?
-हत्येत आणखी कोणाचा सहभाग किंवा आणखी कोणासोबत लोंढेंचे आर्थिक व्यवहार?
जानेवारीतही रचला होता कट?
लोंढे यांच्या हत्येचा कट जानेवारीतच विशालने रचला होता. अहिल्यानगरहून परतताना दारू पाजून त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न विशालने केला होता. मात्र त्या दिवशी लोंढे यांना दारू चढली नाही म्हणून ते वाचल्याचा खुलासा तपासात झाला आहे. हत्येच्या दिवशी विशालने याबाबत खबरदारी घेतली. स्वतः थोडी बीअर घेतली. आकाशने चार-पाच पेगच पिले. लोंढे यांना मात्र त्यांनी अंदाजे ७०० एमएलच्या आसपास दारू पाजली.

अशी केली हत्या...
राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या हत्या प्रकरणात रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४), त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि नातेवाइक करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आलेली आहे. लोंढे ज्योतीनगरात राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहतात. ते मूळचे सौंदरे (ता. बार्शी) येथील होते. ५ फेब्रुवारीला रात्री लोंढे, विशाल आणि आकाशने दोन महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्महाऊसवर पार्टी केली. पार्टीनंतर दोन्ही महिला गेल्यावर तिघे फार्महाऊसबाहेर पडले. नगरनाक्यावरून छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने बंदूक लोंढेंच्या कानाला लावत गोळी झाडली. ही बंदूक लोंढेंचीच होती, जी पार्टीदरम्यान विशालने काढून घेतली होती. हत्येनंतर करणला बोलावून घेत ६ फेब्रुवारीला सकाळी ६ ते ७ दरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला होता.

या आधीच्या बातम्या : पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... - Chhatrapati Sambhaji Nagar City News

छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड - Chhatrapati Sambhaji Nagar City News

आणखी महत्त्वाच्या बातम्या

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश

Latest News

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बाजार इतका फोफावला आहे, की एवढ्या कारवाया होऊनही हा बाजार संपुष्टात...
लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software